Skip to main content

॥ हरिः ॐ ॥
🕉️ गोकुळाष्टमी कार्यक्रम 🕉️
श्रीकृष्ण जन्माष्टमी, श्रीज्ञानेश्वर महाराज जयंती शुक्रवार दि. १५ ऑगस्टला असून त्या निमित्ताने त्याच दिवशी संध्याकाळी ४:३० ते ६:३० या वेळात आदरणीय डॉ. हिमांशु वझे कृष्णकथा करतील. शेवटी छोट्या बालगोपगोपींची दिंडी आणि दहीहंडी होईल.
या कार्यक्रमामध्ये पूजनीय स्वामीजींच्या "अष्टावक्रगीता" या ग्रंथाचं आणि "परमामृत-सार" या पुस्तिकेतील ओव्यांच्या ध्वनिमुद्रित आवृत्तीचं प्रकाशन होईल.
सर्व कृष्णभक्तांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेमाचं, आग्रहाचं निमंत्रण आहे. आपण आपल्या बालगोपाल-गोपिकांना अवश्य घेऊन यावे.
आरती आणि गोपाळकाल्याच्या प्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.
कार्यक्रम तपशील
दिनांक - १५ ऑगस्ट २०२५
वेळ - संध्याकाळी ४:३० ते ६:३०
स्थळ - प्रतिभा कलादालन, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर, पुणे या नवीन जागेचे लोकेशन खालील लिंकवर मिळेल. वेदांत मंगलम् लॉन्सच्या कमानीतून आत यावे.
https://maps.app.goo.gl/E9FGsRxruKcReqsD9
पार्किंगसाठी शेजारील डीपी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जागा उपलब्ध असेल.
-स्वरूपयोग